भारतात ई-सिगारेटवर आहे बंदी !
(ई-सिगारेट, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. हे बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण असून ते धुराऐवजी निकोटीन, फ्लेवर्स आणि रसायनांचे बाष्प निर्माण करते.)

मुंबई, २० जून (वार्ता.) – दादर येथील एका प्रसिद्ध शाळेत विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर म्हणजे ‘ई-सिगारेट’वर भारतात बंदी आहे. तरीही ही १ सिगारेट १ सहस्र रुपयांहून अधिक किमतीला मिळते. एवढ्या महागातील ई-सिगारेट विद्यार्थ्यांकडे आढळून आल्या. या गंभीर प्रकाराविषयी सर्व पालकांना जागृत करण्यासाठी या शाळेने २० जून या दिवशी इयत्ता ९ आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना सांगितला. ही शाळा शिशूवर्गापासून ते इयत्ता १० वीपर्यंत आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये सिगारेटची थोटके आढळली. याविषयी पालकांनी शिक्षकांना सांगितल्यावर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले. त्या वेळी शाळेच्या मधल्या वेळेत काही विद्यार्थी आडोशाला जाऊन ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळून आले.
Distressing Reality: Mumbai School Students Show Growing Interest and Familiarity with E-Cigarettes
|
पाल्याचे दप्तर नियमित पडताळा ! – शाळेची पालकांना सूचना

‘शाळेमध्ये पैसे मागितले असल्याचे खोटे सांगून किंवा घरात पैशांची चोरी करून विद्यार्थी ई-सिगारेट खरेदी करू शकतात. काही विद्यार्थी पैसे गोळा करून एकत्रित ई-सिगारेट घेऊ शकतात. असे प्रकार घडू नयेत, यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांच्या दप्तराची पडताळणी करावी. स्वत:चे पाल्य चुकीच्या मार्गाला जाऊ नये, यासाठी पालकांनी सतर्क रहावे’, अशा सूचना बैठकीत शिक्षकांनी पालकांना दिल्या आहेत. मुंबईत अन्यही काही शाळांमध्ये यापूर्वी विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे प्रकार आढळून आले आहेत.
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !