इराणच्या सर्वाेच्च नेत्याने टीका केल्यानंतर ट्रम्प यांचे प्रत्युत्तर

न्यूयॉर्क – अमेरिकेशी करार झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी निवेदन प्रसारित करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. या टीकेला ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘करार करण्यासाठी मी नाही, तर इराणच अधिक उतावीळ झाला होता’, असा दावा त्यांनी केला आहे.
Iran was more eager to reach an agreement: Trump’s response after criticism from Iran’s Supreme Leader
Despite the peace agreement, the continued exchange of sharp rhetoric between Iran and the United States raises doubts about how long this agreement will endure.… pic.twitter.com/s44KSHqbtz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
काय म्हणाले होते खामेनी ?
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी, ‘अमेरिकेचे नेते करारासाठी उतावीळ झाले होते आणि तो मिळवण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे डावपेच आखले’, असा थेट आरोप केला होता. अमेरिका-इराण करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर खामेनी यांनी इराणी जनतेला सांगितले, ‘माझा या कराराला तत्त्वतः विरोध होता; परंतु नंतर राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आणि इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य यांच्याकडून देशाचे हित जपले जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर मी या कराराला संमती दिली.
इराण संपला आहे ! – ट्रम्प
याला प्रत्युत्तर देतांना ट्रम्प यांनी संतापाने घोषित केले की, इराण आता संपला आहे. संघर्षानंतर अमेरिकेने नव्हे, तर इराणने वाटाघाटींची मागणी केली होती. आम्ही घाई केली नाही. इराणला घाई होती. अमेरिका इराणला कोणतेही आर्थिक साहाय्य करणार नाही. त्यांना एक पैसाही मिळणार नाही.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman