
रत्नागिरी – तालुक्यातील उमरे येथील एका प्रौढाला अपकीर्तीची भीती दाखवून १७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामचंद्र चिंतामणी केळकर (वय ५२, उमरे, ता. रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट(दाखल) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरैय्या हकीम, हुसेन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम (सर्व रहाणार रत्नागिरी) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. १९ जूनला त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
१. २२ जुलै २०२५ या दिवशी तक्रारदार रामचंद्र केळकर हे त्यांच्या भावाला भेटण्यासाठी शहरातील एका रुग्णालयात गेले होते. त्या वेळी त्यांना सुरैय्या हकीम ही महिला रडत असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर तिने तिच्या मुलाची शस्त्रक्रिया झाली असून रुग्णालयाचे देयक (बिल) देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर केळकर यांनी तिला स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक देत आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
२. त्यानंतर सुरैय्या हिने केळकर यांना फोन करून आर्थिक साहाय्य करण्याची विचारणा केली. त्यानुसार मारुति मंदिर परिसरात भेट झाल्यानंतर केळकर यांनी तिला १ सहस्र ५०० रुपये दिले. त्यानंतर तिने आणखी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितल्याने त्यांनी तिच्या ‘गूगल पे’ क्रमांकावर ५०० रुपये पाठवले.
३. २३ जुलै २०२५ या दिवशी सुरैय्याच्या भ्रमणभाषवरून एका पुरुषाने केळकर यांना फोन करून ‘तुमचे आणि सुरैय्याचे संभाषण आम्ही रेकॉर्ड केले आहे. अपकीर्ती (बदनामी) टाळायची असेल, तर १० सहस्र रुपये द्या’, अशी धमकी दिली. अपकीर्तीच्या भीतीने केळकर यांनी संबंधिताने सांगितलेल्या ‘गूगल पे’ क्रमांकावर १० सहस्र रुपये पाठवले.
४. यानंतर वारंवार फोन करून संभाषणाची ध्वनीमुद्रिका नातेवाईक आणि मित्रपरिवाराला ऐकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या केळकर यांनी २२ जुलै २०२५ ते १९ मे २०२६ या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे एकूण १७ लाख ९ सहस्र ४९४ रुपये संबंधितांना पाठवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सततच्या धमकी देऊन पैसे उकळण्याला (ब्लॅकमेलिंगला) कंटाळून शेवटी केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
५. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुरैय्या हकीमसह चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५), ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !
Bhatkal Kidnapping : मुसलमानाने अपहरण केलेल्या हिंदु तरुणीची सुटका करणार्या हिंदुत्वनिष्ठांविरुद्धच गुन्हा नोंद
NEET Retest Scam Busted : टेलिग्रामवर ‘नीट’ची बनावट प्रश्नपत्रिका विकणार्या १९ वर्षीय विद्यार्थ्याला अटक
Anwar Hussain Arrested : गोहत्या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्र्याचा भाऊ अन्वर हुसेन याला अटक
Dhaka Hindu Protest : हिंदूंनी ढाक्यामध्ये काढला विशाल मशाल मोर्चा !
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे