पुणे – सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना ‘पुणे जिल्हा तलाठी संघटने’चे जिल्हाध्यक्ष सुधीर तेलंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शिवापूर (तालुका भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रांझे तलाठी कार्यालयामध्ये २१ ऑगस्ट या दिवशी घडली. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकालाचखोरी नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षेसह संबंधिताची सर्व संपत्ती जप्त केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! |