मुलीला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बडोदा येथील ९० वर्षे वयाच्या श्रीमती शालिनी फाटक !

श्रीमती शालिनी फाटक

‘माझे १८.१२.२०२४ या दिवसाचे बेळगावमार्गे पुणे येथे रेल्वेगाडीने जाण्याचे आरक्षण झाले होते. माझ्या मामेभावाच्या मुलाचे लग्न २२.१२.२०२४ या दिवशी पुणे येथे होते; मात्र गुजराती ग्रंथांशी संबंधित तातडीची सेवा आल्याने मी लग्नाला जायचे रहित केले.

श्रीमती सुचेता जठार

मी याविषयी माझ्या आईला (श्रीमती शालिनी फाटक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के वय ९० वर्षे यांना) सांगितले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘लग्न होतच रहातील; परंतु तुला जी गुरुसेवेची संधी मिळाली आहे, ती पुन्हा केव्हा मिळणार ? तू योग्य निर्णय घेतला आहेस.’’ तिचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली. हे भगवंता, मला अशी आध्यात्मिक आई लाभल्याबद्दल मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती सुचेता जठार (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२४)