शिबिराच्या वेळी त्रास होत असतांना साधकाने ‘त्याचे शरीर, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा रथ आहे’, असा भाव ठेवल्यावर त्याला हलकेपणा जाणवणे

श्री. शिवानंद स्वामी

१. साधकाने त्रास होत असतांना ठेवलेला आध्यात्मिक भाव आणि त्याला आलेल्या अनुभूती

‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर होते. मी त्या शिबिरात उपस्थित असतांना माझे शरीर दुखत होते. त्या वेळी ‘हा आध्यात्मिक त्रास आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘माझे शरीर, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा रथ आहे. भगवान श्रीकृष्ण सारथ्याच्या रूपात माझ्या पुढे आहे आणि मी मागे अर्जुनाच्या रूपात आहे. रथाच्या वर (माझ्या डोक्यावर) हनुमान आहे’, असा भाव मी ठेवला. त्याच क्षणी माझा त्रास न्यून झाला आणि मला हलकेपणा जाणवू लागला.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शिबिराच्या ठिकाणी असलेल्या स्थितीविषयी सांगणे

त्याच वेळी शिबिरात एका साधकाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा संदेश वाचून दाखवला, ‘ही रणभूमी आहे. येथे सूक्ष्म युद्ध चालू आहे.’ ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी तसा भाव माझ्यात आधीच निर्माण केला’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिवानंद स्वामी, कोल्हापूर (२०.८.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक