स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण !
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे येथील विशेष न्यायालयात १८ नोव्हेंबरला उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले होते; पण ते प्रचारात व्यस्त असल्याने न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांना २ डिसेंबर या दिवशी उपस्थित रहाण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले.