धर्मकार्यात सहभागी होण्‍यासाठी बोकारो (झारखंड) येथील एक धर्माभिमानी युवक सायकलने ७ घंटे प्रवास करून रांची येथे येणे !

बोकारो (झारखंड) येथून २३ वर्षांचा एक युवक सकाळी ७ वाजता बोकारो येथून निघालो आणि मला सायकलने येथे पोचायला ७ घंटे लागले. मला हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यात सहभागी होऊन हिंदू आणि हिंदु राष्‍ट्र यांसाठी काहीतरी करण्‍याची इच्‍छा आहे; म्‍हणून मी आलो आहे.

फोंडा, गोवा येथील नवीन वास्‍तूत रहायला गेल्‍यावर साधिकेला झालेले आध्‍यात्मिक त्रास

वैजयंती मण्‍यांची जपमाळ घेऊन नामजप करत असतांना ‘त्‍या जपमाळेचा वापर करू नये’, असे वाटणे आणि जपमाळेकडे पाहिल्‍यावर एखाद्या पडक्‍या अन् त्रासदायक घराचे दृश्‍य दिसणे

संत आणि गुरु यांच्‍याप्रती भाव असलेली ५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची सांगली येथील कु. वेदिका संतोष देसाई (वय १२ वर्षे) !

‘वेदिका ३ वर्षांची असतांना तिला शिकवल्‍याप्रमाणे तिने रांगोळी काढून त्‍यामध्‍ये ‘सनातन प्रभात’ असे लिहिले. ती मंदिराचे चित्र काढायची. तिला एकदाच ‘मातीचा गणपति कसा बनवायचा ?’, याविषयी सांगितले. त्‍याप्रमाणे तिने लगेच मातीचा गणपती बनवला.

साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतांना ‘सौ. सुप्रिया माथूर यांच्‍यात कोणते पालट जाणवतात ?’, याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात झालेले संभाषण

६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुप्रिया सुरजीत माथूर साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात साधकांना ‘सुप्रियाताईंमध्‍ये कोणते पालट जाणवत आहेत ?’, याविषयी झालेल्‍या संभाषणाचा काही भाग १९ नोव्‍हेंबरला पाहिला. आज पुढील भाग पाहूया.  

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी (वय ८९ वर्षे) संत म्‍हणून घोषित होण्‍याच्‍या संदर्भात साधिकेला मिळालेल्‍या पूर्वसूचना !

जेव्‍हा मी प्रथम भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडेगुरुजींना पाहिले, तेव्‍हा त्‍यांचा हसरा चेहरा आणि स्‍थिरता पाहून ‘ते संतच आहेत’, असे मला वाटत होते. ‘त्‍यांच्‍याकडून चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते…

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्त मध्‍यप्रदेश येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती  

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्‍या आज्ञेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. त्‍याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्‍यप्रदेशामधील साधकांना आलेल्‍या अनुभूती १९ नोव्‍हेंबर या दिवशी पाहिल्‍या. आज उर्वरित भाग पाहूया.

मानसिक आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील अध्‍यात्‍मशास्‍त्र यांमधील भेद

‘मानसिक आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील अध्‍यात्‍मशास्‍त्र यांमध्‍ये भेद काय ?’, या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रश्‍नाला सनातनचे सूक्ष्मज्ञानप्रात्‍पकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) यांनी सूक्ष्मातून ज्ञान मिळवून दिलेले उत्तर येथे देत आहोत.

मतदान प्रक्रिया पार पडण्‍यासाठी सातारा जिल्‍हा प्रशासन सज्‍ज ! – जितेंद्र डुडी, जिल्‍हाधिकारी, सातारा

सातारा जिल्‍ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांतील १०९ उमेदवारांचे भवितव्‍य २० नोव्‍हेंबर या दिवशी मतदान यंत्रामध्‍ये बंद होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्‍ह्यातील ३ सहस्र १६५ मतदान केंद्रांवर १६ सहस्र २६१ कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांच्‍या व्‍हिडिओतून काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड !

काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड होत असल्‍याचा आरोप वाघ यांनी केला आहे. अमित देशमुख यांनी भाजपच्‍या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा ‘आर्ची’ (एका चित्रपटातील अभिनेत्रीचे टोपण नाव) असा उल्लेख केला आहे.

एकादशीनिमित्त मंदिरे समितीला कोट्यवधी रुपयांचे उत्‍पन्‍न ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी

कार्तिक एकादशीच्‍या निमित्ताने पंढरपूर येथे झालेल्‍या यात्रा कालावधीत मंदिरे समितीला विविध देणग्‍यांच्‍या माध्‍यमातून ३ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले आहे. यात प्रामुख्‍याने ६ लाख बुंदी लाडू प्रसादाची विक्री झाली आहे.