Rape Row Indian Air Force : वायूदलातील अधिकार्‍यावर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद

श्रीनगर येथील पोलिसांनी भारतीय वायूदलातील एका महिला फ्‍लाइंग अधिकार्‍याच्‍या तक्रारीनंतर वायूदलाच्‍या श्रीनगर स्‍थानकातील विंग कमांडरच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला आहे.

Delhi High Court : न्‍यायालयातील केवळ निकालच नव्‍हे, तर विनोदही आपल्‍याला वाचायला मिळणार !

न्‍यायालयातील निकाल आणि सुनावण्‍या आपल्‍याला नेहमीच ऐकायला मिळतात. आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या या गंभीर वातावरणात घडलेले विनोदही आता आपल्‍याला कळणार आहेत. देहली उच्‍च न्‍यायालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

Bengal Doctors Strike Continues : कनिष्‍ठ डॉक्‍टरांचा संप चालूच !

बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिला डॉक्‍टरच्‍या बलात्‍काराचे प्रकरण ज्‍या संवेदनशून्‍यतेने हाताळले, त्‍यावरून जनतेमध्‍ये संताप्‍त भावना आहेत. केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांची अन्‍यायी राजवट समाप्‍त करत राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Manipur Unrest Escalates : मणीपूरमधील संघर्ष चिघळला !

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, हे सरकारच्‍या कधी लक्षात येणार ?

मुंबईतील लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना अटक !

निकाल बाजूने देण्यासाठी अनुवादकाने एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करतो, हा प्रकार संशयास्पद आहे. यामध्ये न्यायव्यवस्थेतील आणखी कुणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत का ? या दृष्टीनेही अन्वेषण व्हावे !

विदेशी पर्यटनाच्या नावाखाली ‘ट्रॅव्हल्स एक्सप्रेस’कडून अनेकांची फसवणूक !

पोलिसांनी अशा फसवणूक करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा करायला हवी !

‘नागपूर ते सिकंदराबाद’ आणि ‘पुणे ते हुबळी’ ‘वंदे भारत’ गाडी धावणार !

नागपूर आणि पुणे या मार्गांवर ‘वंदे भारत’ गाड्या चालवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ‘नागपूर ते सिकंदराबाद’ आणि ‘पुणे ते हुबळी’ दरम्यान धावणार आहे.

विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाचा वाढीव भत्ता सरकारने नाकारला !

विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यासाठी राज्याच्या गृहरक्षक दलाकडून गृह विभागाकडे मागणी करण्यात आली होती. याविषयी गृहरक्षक दलाच्या महासंचालकांकडून गृहविभागाला पत्र पाठवले आहे; मात्र विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाच्या भत्त्यात वाढ करण्यास गृहविभागाने नकार दिला आहे.

ऑक्टो रिक्शा आणि टॅक्सी मंडळासाठी सरकारकडून ५० कोटीचे अनुदान !

राज्यशासनाने नुकत्याच स्थापन केलेल्या धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्शा आणि मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५० कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले आहे.

मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी लवकरच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार ! – ज्ञानेश्वर मुळे, अध्यक्ष, अभिजात मराठी पाठपुरावा समिती

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे. हा प्रश्न आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि साहित्य ॲकॅडमी यांच्याकडे प्रलंबित आहे.