नवी मुंबई – युरोप आणि सिंगापूर येथे स्वस्तात पर्यटनाच्या नावाखाली ‘ट्रॅव्हल्स एक्सप्रेस’ या आस्थापनाच्या नावाखाली १९ जणांची ३९ लाख ७ सहस्र ७४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात संबंधित आस्थापनाचा चालक-मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांनी तक्रार दिली आहे. तक्रारदारांची संख्या वाढू शकते. ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी वाशी पोलिसांशी संपर्क करून तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विकी उपाख्य भूपेश ठक्कर असे यातील आरोपीचे नाव आहे.
सामाजिक माध्यमातून विज्ञापन प्रसारित केले होते. अनेकांनी त्याला बळी पडून युरोप, अमेरिका, सिंगापूर येथे पर्यटनाला जाण्यासाठी नोंदणी केली; मात्र तिकीट आणि हॉटेल बुकिंग पावती आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी पर्यटक आले, त्या वेळी आरंभी त्यांना कारणे सांगून टाळण्यात आले. नंतर कार्यालयास टाळे लावून आरोपी विकी पळून गेला.
संपादकीय भूमिकापोलिसांनी अशा फसवणूक करणार्यांना पकडून कठोर शिक्षा करायला हवी ! |