Shahi Idgah Case : शाही ईदगाहचे ‘धार्मिक स्‍वरूप’ निश्‍चित करणे आवश्‍यक ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

मथुरेतील श्रीकृष्‍णजन्‍मभूमी-शाही ईदगाह वाद !

ADR Report : निवडणूक आयोगाच्या लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा ‘ए.डी.आर्.’चा दावा !

या चुकीचे दायित्व निवडणूक आयोगाचेच असून त्याने यासंदर्भात त्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि आवश्यकता असल्यास काही मतदारसंघांची पुनर्मतमोजणी केली पाहिजे !

AIDS Vaccine : एड्‍सग्रस्‍तांसाठी बनवण्‍यात आली लस !

या लसीचे २ डोस घेतल्‍यानंतर रुग्‍ण महिलांमध्‍ये १०० टक्‍के चांगला परिणाम दिसून आला आहे. तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍यावर कोणताही दुष्‍परिणाम झालेला नाही. या लसीचे नाव ‘लेनकापाविर’ ठेवण्‍यात आले आहे.

Kanwar Yatra Hindu Shops : उत्तरप्रदेशातील कावड यात्रेच्‍या मार्गांवरील हिंदु दुकानदारांना मान्‍य आहे दुकानांवर मालकाचे नाव लिहिणे !

उत्तरप्रदेश सरकारने कावड यात्रेच्‍या मार्गांवरील दुकानदारांना त्‍यांच्‍या दुकानांवर स्‍वतःचे खरे नाव लिहिण्‍याचा आदेश दिला होता.

Firhad Hakim : (म्‍हणे) ‘मी मुसलमान असूनही दुर्गापूजेचे नियमितपणे आयोजन करतो !’ – बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम

फिरहाद यांच्‍या ‘जे इस्‍लाममध्‍ये जन्‍मले नाहीत, ते दुर्दैवी आहेत’, या वक्‍तव्‍यावरून त्‍यांच्‍या मनात काय चालले आहे ?, हे स्‍पष्‍ट होते ! अशांची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, हे हिंदूंनी जाणावे !

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना हे लांच्छनास्पद नव्हे काय ?

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजहित आणि राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे हे कसे समजत नाही ? उद्या त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी  करणार्‍यांना पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.’

संपूर्ण देशातील बेकायदेशीर मदरसे बंद करा !

अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ९४ बेकायदेशीर मदरशांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या मदरशांमध्ये शिकणार्‍या सुमारे २ सहस्र विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये हालवण्यात येणार आहे.