‘जे इस्लाममध्ये जन्मले नाहीत, ते दुर्दैवी आहेत’, असे वक्तव्य करणारे बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांचा नवा दावा !
कोलकाता (बंगाल) – बंगाल राज्य सरकारमधील मंत्री आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, ‘जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. आम्ही (मुसलमानांनी) त्यांना इस्लामच्या कक्षेत आणले पाहिजे.’ त्यांच्या या विधानाला विरोध झाल्यानंतर त्यांनी आता बंगाल विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी नवा दावा केला आहे. ते म्हणाले की, मी मुसलमान असूनही दुर्गापूजा आणि कालीपूजा नियमितपणे आयोजित करतो.
Firhad Hakim: “Even though I am a Mu$l!m, I regularly organize Durga Puja!” – Bengal Minister Firhad Hakim
The new claim of Bengal Minister Firhad Hakim, who stated, “Those who are not born into I$lam are unfortunate!”
Firhad’s statement, “Those who are not born into I$l@m are… pic.twitter.com/QhrxefTTcg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 2, 2024
हकीम पुढे म्हणाले की, जेव्हा मी एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी (विधानसभेत) उभा रहातो, तेव्हा भाजपचे आमदार सभागृहातून बाहेर पडतात. माझ्या कोणत्याही टिपण्यांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्यास मी काय करू शकतो ? भाजपचे लोक मला धर्मनिरपेक्ष मानतात कि नाही ? मी कधीही इतर कोणत्याही धर्माच्या लोकांचा अपमान केला नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तसे करणार नाही. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझा जन्म धर्मनिरपेक्ष कुटुंबात झाला आणि भविष्यातही मी धर्मनिरपेक्षच राहीन. (असे आहे, तर हकीम यांनी धर्मनिरपेक्षतेचा डोस बंगालमधील मुसलमानांनाही पाजला पाहिजे आणि तेथील हिंदूंच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा हे सर्व ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरेल, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|