लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने कावड यात्रेच्या मार्गांवरील दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर स्वतःचे खरे नाव लिहिण्याचा आदेश दिला होता. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने तो स्थागित केला. या संदर्भात कावड यात्रेच्या मार्गांवरील हिंदु दुकानदारांनी सरकारच्या आदेशाचे स्वागत केले आहे; कारण या भागांमध्ये बहुतांश दुकानदार मुसलमान आहेत.
Uttar Pradesh : Hindu shopkeepers on the routes of the Kanwar Yatra are allowed to display the owner’s name on their shops#KanwadYatra2024 #Kanwariyas #KanwarYatra pic.twitter.com/MjMXwjupRH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 3, 2024
१. कावड यात्रेत वापरण्यात येणारे रथ बनवणारे दिनेश कुमार यांनी सांगितले की, त्यांचे ‘माँ हरसिद्धी देवी फॅब्रिकेशन’ नावाचे दुकान आहे. हे दुकान गाझियाबादमध्ये आहे. आता मुसलमान स्वतःचे नाव पालटून या व्यवसायात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
ते या व्यवसायावर त्यांची पकड भक्कम करत आहेत. ते त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देऊन व्यवसाय करत आहेत. त्यामुळे माझे ग्राहक त्यांच्याकडे वळू लागले आहेत. माझ्या घरात माझे २ भाऊ आहेत. आम्ही तिघे मिळून काम करू शकत नाही. आम्हाला कामगार ठेवावे लागतात. मुसलमानांच्या घरात अनेक लोक असतात आणि तेच दुकानात काम करतात. सरकारच्या आदेशामुळे आम्हाला लाभ होत आहे. सर्व लोकांनी त्यांचा व्यवसाय त्यांच्या खर्या नावानेच करावा.
२. गाझियाबाद-मेरठ मार्गावर ढाबा चालवणारे श्री. अश्वनी सैनी यांनी सांगितले की, एक दुकान मालक या नात्याने नावावरून वाद निर्माण होण्यामागील कारण समजत नाही. ढाब्याच्या खर्या मालकाचे नाव लिहायला काय अडचण आहे ?
३. मेरठ मार्गावर भोजनालय चालवणारे रामकुमार चौहान यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयाचे पूर्ण स्वागत करतो. देहली ते हरिद्वार या मार्गावर नाव पालटून धाबे चालवले जात आहेत. यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे.
सावरकर नावाचा ढाबा बंद करावा लागला !
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सावरकर ढाबा बंद करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. मुझफ्फरनगर-मेरठ महामार्गावरील साखर कारखान्याजवळ हा ढाबा होता. त्याचे मालक सत्य प्रकाश यांनी सांगितले की, वीर सावरकरांच्या नावाने ढाबा उघडण्यामागे ग्राहकांना चांगले खाणे-पिणे उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्यांना देशातील एका महान क्रांतीकारकाच्या नावाची ओळख करून देणे हा होता; मात्र विशिष्ट विचारांच्या लोकांना ढाब्याचे नाव आवडले नाही. ढाब्यावर ग्राहक येणेच थांबले नाही, तर चोरीसारख्या घटनाही घडल्या. मुझफ्फरनगर आणि आसपासच्या परिसरात अनेक ढाबे बनावट नावाने चालू आहेत.