‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्याचा सातारा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या ‍वतीने आदर्श गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित आली. ही बैठक राजवाडा येथील समर्थ सदन येथे आयोजित करण्यात आली होती.

गणेशोत्सव मंडळांना ५ वर्षांसाठी अनुमती देण्यात यावी ! – शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळांची मागणी

पुणे आणि इतर ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवेदन प्रविष्ट केल्यावर ५ वर्षांसाठी अनुमती देण्याचा विचार चालू आहे. त्याचप्रमाणे शहरातील मंडळांनाही ५ वर्षांसाठी अनुमती देण्यात यावी.

हिंदु धर्मप्रेमी शिवाजी डोंगरे यांनी घडवली २१ सहस्र भाविकांना अमरनाथ यात्रा !

एकूण १० दिवसांच्या या यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी करावी लागते. यंदा मिरज येथून जे भाविक यात्रेसाठी रवाना झाले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या.’’

मिरज येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरात श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम पठण !

श्री माधवराव गाडगीळ मित्र परिवार आणि श्री काशीविश्वेश्वर देव ट्रस्ट यांच्या वतीने येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात तिसरा सोमवार, १९ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत ‘फडके महिला भजनी मंडळ’ यांचे श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण १८ अध्यायपठण आणि श्री विष्णु सहस्रनामाच्या पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – बापू ठाणगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी येथील वीर सावरकर चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. या वेळी गोसेवा समिती, हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्र निर्माण सेना, पतितपावन संघटना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या काळात ‘उल्लास- नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांची जनजागृती करावी ! – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख ६७ सहस्र ८२३ इतके असाक्षर असून त्यापैकी ३ लाख ५३ सहस्र ६०२ पुरुष आणि ७ लाख १४ सहस्र २२१ इतक्या महिला आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे केंद्रशासनाने विशेष लक्ष दिले असून ‘उल्लास-नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या ‘नवसाक्षरता अभियाना’कडे पुणे जिल्ह्याची पाठ !

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सर्वाधिक निरक्षर असणे लज्जास्पद !

सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो ! – ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले  

प्राप्त आयुष्यात वाईट कामे करू नका. सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो. देवाला खेचून आणण्याचे बळ आपण केलेल्या पुण्यकार्यात आहे. भूतकाळातील कृत्यांचा विचार न करता पुढील आयुष्यात चांगली कृत्ये करून पुण्य कमवा, असे प्रतिपादन गाथा मंदिर, देहू येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने ऑस्ट्रेलियातील हिंदूंसाठी ‘श्राद्ध – एक महत्त्वपूर्ण कर्म’ या विषयावर पार पडले ऑनलाईन प्रवचन !

‘केरळ हिंदु सोसायटी मेलबर्न कॉर्पाेरेशन’, या ऑस्ट्रेलियामधील केरळमधील हिंदूंच्या संघटनेने हिंदूंना ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्र’ समजावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ऑनलाईन प्रवचन घेण्याची व्यवस्था केली.

गोहत्या करतांना व्हिडिओ करून तो प्रसारित करणार्‍यांवर कठोर कारवाईची निषेध फेरी आणि निवेदन यांद्वारे मागणी !

गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १० ऑगस्ट या दिवशी समस्त हिंदु संघटनांनी एकत्र येत निषेध फेरी काढली. या वेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.