
सांगली – येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे हे गेल्या १६ वर्षांपासून भाविकांना अमरनाथ यात्रा घडवत आहेत. गेल्या १६ वर्षांपासून त्यांनी २१ सहस्र भाविकांना अमरनाथ यात्रा घडवली आहे. या संदर्भात शिवाजी (पप्पू) डोंगरे म्हणाले, ‘‘कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली आणि अत्यंत खडतर असलेली अमरनाथ यात्रा सांगलीतून गेली १६ वर्षे चालू आहे. गोरगरीब आणि कष्टकरी वर्गातील जे लोक इच्छा असूनही भोलेनाथाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, अशांसाठी आम्ही ‘विनामूल्य’ या यात्रेचे नियोजन करतो. एकूण १० दिवसांच्या या यात्रेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणी करावी लागते. यंदा मिरज येथून जे भाविक यात्रेसाठी रवाना झाले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या.’’

अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ५ दिवसांतच गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग वितळले
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून प्रारंभ !
Himachal Heavy Rains : उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे हाहा:कार : हिमाचल प्रदेशात १०६ जणांचा मृत्यू !
Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेला प्रारंभ !
Amarnath Yatra 2025 : अमरनाथ यात्रेला प्रारंभ : साडेतीन लाख भाविकांची नोंदणी