गणेशोत्सव मंडळांना ५ वर्षांसाठी अनुमती देण्यात यावी ! – शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळांची मागणी

शहापूर विभागातील बैठकीसाठी जमलेले गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी

बेळगाव – पुणे आणि इतर ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवेदन प्रविष्ट केल्यावर ५ वर्षांसाठी अनुमती देण्याचा विचार चालू आहे. त्याचप्रमाणे शहरातील मंडळांनाही ५ वर्षांसाठी अनुमती देण्यात यावी. त्यामुळे महापालिका आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन मंडळांनी मागणी करूया. गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने शहरातील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी शहापूर विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. गणेशोत्सव काळात येणार्‍या अडचणींविषयी चर्चा करण्यासाठी ११ ऑगस्टला शहापूर येथील ‘बलभीम व्यायाम मंडळ सांस्कृतिक भवन’ येथे गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ही मागणी करण्यात आली.

या प्रसंगी ‘शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळा’चे अध्यक्ष नेताजी जाधव, माजी नगरसेवक रमेश सौंटक्की, विजय भोसले, राजू बिर्जे, माजी उपमहापौर संजय शिंदे, नगरसेवक नितीन जाधव, ओशक चिंडक यांसह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्ष २०२० मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव येथील विहिरीची पडझड झाली आहे. त्यामुळे विसर्जन करण्यास अडचण होत असल्याने या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली.