मिरज येथील श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरात श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीविष्णुसहस्रनाम पठण !

 

मिरज, १२ ऑगस्ट (वार्ता.) – पवित्र अशा श्रावण मासाच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री माधवराव गाडगीळ मित्र परिवार आणि श्री काशीविश्वेश्वर देव ट्रस्ट यांच्या वतीने येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात तिसरा सोमवार, १९ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत ‘फडके महिला भजनी मंडळ’ यांचे श्रीमद्भगवद्गीता संपूर्ण १८ अध्यायपठण आणि श्री विष्णु सहस्रनामाच्या पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री माधवराव गाडगीळ मित्र परिवार, श्री विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, श्री दासबोध अभ्यास मंडळ आणि सनातन संस्था, मिरज यांच्या वतीने करण्यात येत आहे. अत्यंत यशस्वीपणे गेली २२ वर्षे सातत्याने हा उपक्रम आयोजित केला जात आहे, अशी माहिती श्री. माधवराव गाडगीळ यांनी दिली.