महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उदासीनतेचा परिणाम !
नवी मुंबई – शहरात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या विजयी उमेदवारांची विज्ञापने मोठ्या प्रमाणात विनाअनमुती लावण्यात आली आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे नोंद केल्यास याला आळा बसू शकेल. तसेच संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्हे नोंद करण्याचे किंवा दंडात्मक कारवाई करण्याचे प्रावधान आहे; मात्र अतिक्रमण विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे आयुक्त कैलास शिंदे यांनी ‘सर्व संबंधितांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून कारवाई करावी’, अशी मागणी सर्वसामान्य करदात्यांकडून करण्यात येते.