‘ॲप’ आधारित टॅक्सीचालकाने भाडे स्वीकारून रहित केल्यास आस्थापनाला भुर्दंड !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ॲप आधारित टॅक्सीसेवेच्या अंतर्गत अनेक चालक भाडे स्वीकारून अचानक रहित करतात. असा प्रकार घडल्यास आता त्याचा भुर्दंड संबंधित आस्थापनाला बसणार आहे. तसे केल्यास प्रवाशांना भरपाई देण्याची महत्त्वाची शिफारस ‘ॲप आधारित टॅक्सी नियमन समिती’ने केली आहे. गर्दीच्या वेळी वाढीव भाडे आकारण्यावर अंकुश ठेवण्याचीही शिफारस समितीने केली आहे.

चालकाने भाडे नाकारल्यास प्रवाशांना भरपाई मिळावी आणि भरपाईची रक्कम किती असेल, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. प्रवाशांच्या वॉलेटमध्ये दंडाची रक्कम जमा करावी किंवा पुढील भाडेदरातून दंडाची रक्कम वजा करण्यात यावी, अशी बहुपर्यायी शिफारस समितीने केली आहे.