आगाऊ शुल्क न भरल्याने ११२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला !

  • ठाणे येथील घटना !

  • युवासेनेकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन

ठाणे – नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आगाऊ शुल्क न भरल्याने ११२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. ठाणे येथील एका शाळेत हा प्रकार घडला. शुल्क भरण्यासाठी २ दिवस असतांनाही प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त झाले. संबंधित प्रकाराची माहिती मिळताच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक कार्यकर्त्यांसह शाळेत आले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रश्नी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवले असल्याचेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

शुल्क भरण्यासाठी २ दिवस असतांनाही शाळेने अशी अरेरावी का केली ? या प्रकरणी संबंधितांना खडसवायलाच हवे !