सांगली येथील खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा !

सांगली, ७ जून (वार्ता.) – येथील लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ६ जून या दिवशी सादर केले. या वेळी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील सहयोगी सदस्य पद स्वीकारले आहे, तसेच ४ जून या दिवशी विशाल पाटील हे विजयी झाल्यानंतर त्यांनी ‘त्यांचा काँग्रेसला पाठिंबा असेल’, असे घोषित केले होते.