‘व्हीजेटीआय’ संस्थेच्या दोन तज्ञांकडून अहवाल !
मुंबई – कमकुवत पाया आणि सदोष संरचना यांमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय विज्ञापन फलक पडला, अशा स्वरूपाचा अहवाल ‘व्हीजेटीआय’ संस्थेच्या दोन तज्ञांनी दिला आहे. मुंबईला वादळी वार्याचा धोका असतो; मात्र वादळी वार्यात टिकेल इतक्या क्षमतेची या विज्ञापन फलकाची संरचनात्मक बांधणी नव्हती, असे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल महापालिका प्रशासनाला देण्यात आला. (आतातरी सर्वत्रच्या विज्ञापन फलकांची संरचनात्मक बांधणी केली आहे का ? हे महापालिकेने पडताळायला हवे ! – संपादक)