खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत अज्ञातांकडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ७ जून (वार्ता.) – भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले. या निमित्ताने शहरांमध्ये त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये अज्ञात चोरांनी ८ तोळे सोन्याचे दागिने चोरले असल्याच्या तक्रारी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्या आहेत. या मिरवणुकीमध्ये ५ सहस्रांहून अधिक समर्थक सहभागी झाले होते. यासारख्या अजूनही दोन-चार घटना घडल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनांची स्वतःहून नोंद घेत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

विजयी मिरवणुकीमध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी होणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षण!