पिंपरी (पुणे) – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ४ जून या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळी शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्तावर असतांना अंमलदार नागेश भालेराव शासकीय वाहनात बसले होते. त्या वेळी वाहनाचे इंजिन चालू होते. गाडी चालू झाल्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणार्या शकुंतला यांच्यासह उभ्या असणार्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला गंभीररित्या घायाळ झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुचाकींचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. घटनास्थळी आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना नागेश यांनी मद्यसेवन केले असेल, याचा संशय आला. त्यामुळे त्यांची वैद्यकीय पडताळणी करण्यात आली. यामध्ये नागेश यांनी मद्यसेवन केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेची नोंद घेत भालेराव यांना निलंबित केले आहे. (अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)