अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

उद्धव ठाकरे चुकीच्या विचारांच्या लोकांसमवेत गेले. अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्षाकडून ‘डंके की चोट पे’ (अगदी ठासून सांगणे) निवडणूक लढवणार, असे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.

शेतकर्‍यांच्या मागण्यांविषयी कार्यवाहीही चालू झाली आहे ! – पालकमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांच्या नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाहीही चालू झालेली आहे, असे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांना दिले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधून कारवाई करा !

मनमाड येथे २९ फेब्रुवारी या दिवशी अशाच प्रकारची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणार्‍या काही माथेफिरूंनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले.

लोकप्रतिनिधी आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे ‘लायसन्स’ मिळाले असे नाही ! – देवेंद्र फडणवीस

‘व्होट के बदले नोट’ प्रकरणात लोकप्रतिनिधींना कुठलेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.

तथाकथित विचारवंतांनो, हिंदूंच्या देवतांच्या रूपांसंदर्भात विधाने करण्यापूर्वी त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घ्या !

‘अध्यात्मशास्त्राच्या ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबधित शक्ती एकत्रित असतात’, या सिद्धांतानुसार आणि देवतेच्या अवताराच्या कार्यानुरूप आवश्यक असे देवतेचे ते ते रूप तयार झालेले असते. हे लक्षात न घेताच हल्ली अनेक तथाकथीत विचारवंत हिंदूंच्या देवतांच्या विविध रूपां‍विषयी हास्यास्पद विधाने करत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले असून यांत एक जण मुसलमान आहे. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात.

संपादकीय : भारतात असे करा !

जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

धुंदी…नशा आणि अहंकार यांची !

धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !