|
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील चिकलठाणा येथील कामगार कॉलनीमधील हनुमान मंदिरात १२ मार्च या दिवशी रात्री ७.३० वाजता आरती चालू असतांना ५० ते ६० धर्मांधांनी हैदोस घालून ‘१ महिना आरती करू नका’, असे हिंदूंना धमकावले. त्यावरून वाद होऊन धर्माधांनी २ हिंदु तरुणांना मारहाण करून एका हिंदु महिलेला धक्काबुक्की केली. (क्षुल्लक कारणावरून हिंदूंना वेठीस धरून त्यांना मारहाण करण्यासाठी धर्मांध संधीच शोधत असतात ! – संपादक) ही वार्ता समजताच हिंदु-मुसलमान गटांतील तरुण समोरासमोर आले. हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या, तर धर्मांधांनी ‘अल्ला हो अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा दिल्या. त्यानंतर दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.
१. चिकलठाणा येथे हनुमान मंदिरात आरती चालू असतांना त्याच वेळी तेथील जवळच असलेल्या मशिदीतील ध्वनीक्षेपकांवरून अजान दिली जाते. त्यामुळे यावरून हिंदु-मुसलमान यांच्या धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकांवरून दीड वर्षांपासून धुसफूस चालू आहे.
२. दीड वर्षापूर्वी या कारणावरून हिंदु-मुसलमान यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी ज्येष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेऊन सामोपचाराने वाद मिटवला होता; मात्र हा वाद १२ मार्चच्या रात्री पुन्हा उफाळून आला.
३. हनुमान मंदिरात आरती चालू असतांना ५० ते ६० धर्मांधांच्या जमावाने मंदिरात घुसून हिंदूंना आरती बंद करायला सांगून हिंदूंना दमदाटी केली. ‘आमच्या प्रार्थनेच्या वेळी तुम्ही आरती म्हणू नका’, अशी तंबी धर्मांधांनी हिंदूंना दिली. (मशिदीतून भोंग्याद्वारे ५ वेळा हिंदूंना अजान का ऐकवली जाते ? याचा जाब धर्मांधांना विचारालेला त्यांना चालेल का ? – संपादक)
४. यावरून वाद चालू झाल्यावर धर्मांधांनी राजू रोटे आणि कृष्णा नागे यांना मारहाण केली. त्यात ते घायाळ झाले. त्यांना सिडको एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवून घेण्यात आली.
५. धर्मांधांनी एका महिलेला धक्काबुक्कीही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदु-मुसलमान गटांतील तरुण रस्त्यावर आले. ते परस्परविरोधी घोषणा देत होते. तणाव वाढल्याने व्यापार्यांनी दुकाने बंद केली.
६. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकार्यांसह दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव दलाचे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी आले.
७. रस्त्यावरील जमाव गल्लीत उभा होता. पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. या भागात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
८. ‘पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून चिकलठाणा येथे शांतता आहे. या घटनेत जे लोक सहभागी होते, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. सामाजिक माध्यमांवरील कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी केेले आहे. (पोलिसांनी हैदोस घालणार्या धर्मांधांना प्रथम अटक करावी, असे हिंदूंना वाटते. – संपादक)
संपादकीय भूमिका
|