६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर (वय ५० वर्षे) यांची नाशिक येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘आरंभी माझ्यामध्ये साधनेविषयी गांभीर्य पुष्कळ अल्प होते. निरंजनदादांनी मला साधनेविषयी मार्गदर्शन करून माझ्यामध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण केले.’

लहान वयापासून सात्त्विकता आणि सेवा यांची ओढ असलेली कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कु. पूजा कल्लाप्पा टोपकर (वय १७ वर्षे) !

पूजा सेवा करतांना ‘समवेत सेवा करणार्‍या साधकांना काही साहाय्य हवे का ?, तेही पहाते आणि तिला शक्य होईल, ते सर्व साहाय्य त्यांना करते.’    

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी.

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि इतरांचे कौतुक करणारे सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) !

उद्या २८.१.२०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने एका साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

हसतमुख, प्रेमळ आणि साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या सांगली येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. विद्या सुरेश जाखोटिया (वय ६२ वर्षे) !

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या सूत्रावर चिंतन लिहायला सांगत असत अन् सत्संगात त्याविषयी आढावा घेऊन चर्चा केली जात असे. यातून त्यांनी साधकांना चिंतन करण्याची सवय लावली.

पू. पृथ्वीराज हजारे यांच्या ‘वाहन चालवतांना मिळणारी गुणसंवर्धनाची संधी’ याविषयीच्या मार्गदर्शनातून श्री. हर्षद खानविलकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

संत जीवनात असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. ‘प्रत्येक कृतीच्या माध्यमातून साधना कशी करू शकतो ?’, हे गुरूंच्या नंतर संतच शिकवतात. साक्षात् संतांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करतांना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो, हे मला शिकायला मिळाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल (वय २७ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत आरती करतांना देवताही आरती करत आहेत’, असे सूक्ष्मातून जाणवले.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना उरण, रायगड येथील सौ. ऋषिका ठाकूर यांना आलेल्या अनुभूती

‘आश्रमातील चित्रीकरण कक्षामध्ये गेल्यावर मला वेगळेच चैतन्य अनुभवता आले. चित्रीकरण कक्षातून बाहेर पडतांना मला चंदनाचा सुगंध आला.

गडकोट मोहिमेसाठी जाणार्‍या सांगली येथील धारकर्‍यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२४ ची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम ही २४ ते २८ जानेवारी या कालावधीत दुर्ग श्रीरायरेश्वर ते श्रीप्रतापगड (मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर) अशी होत आहे.