|
मुंबई – येथील २१ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असल्याचे तिनेच ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून उघड केले. तिने ‘मी नशेत असतांना सामाजिक माध्यमावर ओळख झालेल्या मित्राने माझ्यावर बलात्कार केला’, असे सांगितले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. बलात्कार १३ जानेवारीला झाल्याचे तिने म्हटले आहे. आरोपीचे नाव हेतिक शाह आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. १३ जानेवारीला ते दोघे एकत्र भेटले होते. याआधी त्यांची ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाली होती.
२. रात्री भेटल्यावर त्याच्या समवेत मद्य प्यायल्याने पीडित मुलगी नशेत होती. त्याने तिला दारू पिण्यासाठी सक्ती केली. डोळ्यांपुढे अंधारी आल्याने पुढे काय घडले, ते तिला आठवत नाही.
३. ती शुद्धीवर आली, तेव्हा हेतिक तिच्यावर बलात्कार करत होता. तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण तो थांबलाच नाही. त्याने ३ वेळा तिच्या कानशिलात लगावल्या. त्याने त्याच्या मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. मित्रांनी तेथून तिला हाकलले आणि धमकावले.
४. आई-वडिलांना सांगून नंतर या मुलाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर दुसर्या दिवशी हेतिकने तिची क्षमा मागितली आणि तो फरार झाला. १२ दिवस उलटूनही तो फरारच आहे.
संपादकीय भूमिकासामाजिक संकेतस्थळांवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करतांना सतर्क रहा ! |