Maldives President On RepublicDay : मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू यांनी भारताला दिल्या प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा !

मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

माले (मालदीव) : गेल्या काही दिवसांपासून मालदीवसमेवत तणावाचे संबंध मालदीवकडून निर्माण करण्यात आल्यानंतर आता मालदीवचे राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांनी भारताच्या प्रजासत्ताकदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

(सौजन्य : Oneindia News)

यात त्यांनी म्हटले की, मला आशा आहे की, भारत आणि मालदीव यांच्यातील शतकानुशतके जुनी मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल. मी भारत सरकार आणि नागरिक यांच्यासाठी शांतता आणि विकास यांसाठी शुभेच्छा देतो.