१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना रंगेहात पकडले !

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, २७ जानेवारी (वार्ता.) – १३ सहस्र रुपयांची लाच घेतांना फलटण येथील मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके आणि सजा फलटणच्या तलाठी श्रीमती रोमा कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या सातबारा उतार्‍यावर भूमीची नोंद करण्यासाठी तलाठी श्रीमती रोमा कदम यांनी स्वतःसाठी ३ सहस्र रुपये आणि मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके यांच्यासाठी १० सहस्र रुपये मागणी केली. याविषयी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारीची नोंद घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. नंतर मंडल कार्यालयात सापळा रचून दोघांनाही १३ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.