लोकलगाडीत सोन्याचे दागिने चोरणारी टोळी अटकेत

त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

माझ्या घरावर आक्रमण करण्यासाठी १० जन्म घ्यावे लागतील ! – बबनराव लोणीकर, माजी मंत्री

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी घरावरील आक्रमणाचे वृत्त फेटाळून लावले आहे.

रायरेश्वर गडावर (भोर) जाण्यासाठी लोखंडी जिन्याचे लोकार्पण !

वन विभागाच्या वतीने या लोखंडी जिन्यासाठी वन पर्यटन विकास योजनेंतर्गत ७ लाख २४ सहस्र रुपये व्यय करण्यात आले.

जालना येथे टोळक्याकडून राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफोड !

जालना येथे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या चारचाकी वाहनावर २ डिसेंबर या दिवशी अज्ञातांनी आक्रमण केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ गावे ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित

‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ‘हर घर जल योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ३२ सहस्र ६९ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे.

वर्ष २०२४ मध्ये भाजप हॅटट्रिक करील ! – भाजपचे माजी आमदार बाळ माने

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांची विधानसभेची उपांत्य फेरी जिंकत भाजपने बाजी मारली आहे. आता लोकसभा महाविजय २०२४ ची अंतिम फेरी नक्कीच जिंकून भाजप हॅटट्रिक करील आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शपथ घेतील.

Indian Navy Day 2023 : नौसेना दिनानिमित्त वाहतुक व्यवस्थेत बदल

जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व तारकर्ली येथे भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त वाहतूक व्यवस्थेतील झालेले पालट देत आहोत.

२६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची ३ डिसेंबर या दिवशी सांगता झाली. २ दिवसांसाठी आयोजित या परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या विश्‍वस्तांनी २६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे सांगितले.

गाव तेथे मंदिर महासंघाची शाखा निर्माण व्हावी ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले.