ठाणे, ३ डिसेंबर (वार्ता.) – लोकलने प्रवास करणार्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजोरीने खेचून पसार झालेल्या अमन खरवार (वय १९ वर्षे) आणि त्याच्या अन्य २ परप्रांतीय साथीदारांना लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.