भोर (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वराज्या’ची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडावर ‘रायरी’मार्गे जाणार्या रस्त्यावर उभारलेल्या लोखंडी जिन्याचे लोकार्पण आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. वन विभागाच्या वतीने या लोखंडी जिन्यासाठी वन पर्यटन विकास योजनेंतर्गत ७ लाख २४ सहस्र रुपये व्यय करण्यात आले.
या वेळी भोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वनपाल व्ही.टी. पवार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.