Lashkar e Taiba : इस्रायलकडून ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी !

आता भारताने ‘हमास’वर बंदी घालावी, अशीच इस्रायलची अपेक्षा असणार, यात शंका नाही ! भारत अशी बंदी घालणार का ?, हाच प्रश्‍न आहे !

उत्तरप्रदेशातील हलाल प्रमाणपत्रावरील बंदीच्या विरोधात इस्लामी संस्था न्यायालयात जाणार !

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातल्यानंतर ‘जमीयत उलमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ने न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

३६ घंट्यांत ‘डीपफेक व्हिडिओ’ हटवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !  

केंद्र सरकारची सामाजिक माध्यमांना चेतावणी !

३ सहस्र अर्जांमधून २०० जणांच्या मुलाखती घेण्यास आरंभ !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील पुजारी पदासाठीची निवड
२० जणांची ‘पुजारी’ म्हणून नेमणूक करणार !
६ मासांचे प्रशिक्षणही देणार

54th iffi 2023 Opening Ceremony : चित्रपट निर्मितीमध्ये प्रमुख स्थान बनण्याच्या दृष्टीने गोव्याची वाटचाल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वर्ष २००४ पासून गोवा राज्य या महोत्सवाचे यजमानपद भूषवत आहे. इथे लवकरच चित्रपट नगरी उभी रहाणार आहे. पुढील २ ते ३ वर्षांत हे काम पूर्णत्वास जाईल !

Goa Late Night Music Parties :मोरजी आणि मांद्रे या संवेदनशील समुद्रकिनार्‍यांवर रात्रीच्या वेळी कर्णकर्कश संगीत पार्ट्या नित्याच्याच !

पर्यावरणप्रेमी याविषयी आवाज का उठवत नाहीत ? त्यांचे पर्यावरणप्रेम केवळ विकास प्रकल्पांना विरोध करण्यापुरतेच आहे का ?

सिंधुदुर्ग : दोडामार्ग येथे विजेच्या धक्क्याने २ म्हशींचा मृत्यू, तर १ गंभीररित्या घायाळ

खाली पडलेल्या खांबातील वीजवाहिन्यांमधून वीजप्रवाह चालू ठेवणे म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे ! या चुकीसाठी संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

Increase In Arabian Sea Water Temperature : वादळांची संख्या वाढण्याची शक्यता ! – राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था

हवेतील आर्द्रता हा वादळ निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने हवेची आर्द्रता वाढते आणि वादळ निर्माण होण्याची शक्यताही वाढते.

शिवशक्‍ती प्रतिष्‍ठान आयोजित गड-दुर्ग छायाचित्र प्रदर्शन

कोल्‍हापूर येथे शिवशक्‍ती प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी काढलेल्‍या भारतातील गड-दुर्गांच्‍या छायाचित्रांच्‍या प्रदर्शनाचे उद़्‍घाटन छत्रपती शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

शासनकर्त्‍यांच्‍या वेगळ्‍या धोरणांमुळे पेशव्‍यांचा खरा इतिहास लोकांसमोर आला नाही ! – डॉ. गो.बं. देगलूरकर, मूर्तीशास्‍त्राचे ज्‍येष्‍ठ अभ्‍यासक

पेशव्‍यांनी मराठेशाहीचा इतिहास निर्माण केला. त्‍यांनी ब्राह्मणांचा इतिहास निर्माण केलेला नाही; परंतु शासनकर्त्‍यांच्‍या वेगळ्‍या धोरणांमुळे पेशव्‍यांचा खरा इतिहास लोकांसमोर आला नाही, अशी खंत मूर्तीशास्‍त्राचे ज्‍येष्‍ठ अभ्‍यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्‍यक्‍त केली.