भ्‍याड आक्रमणामागील गुन्‍हेगारांना शोधून कठोर कारवाई करण्‍याची निवेदनाद्वारे मागणी

जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यातील गौह या गावातील श्री कानिफनाथ देवस्‍थान हे या गावाचे ग्रामदैवत असल्‍याने गेल्‍या अनेक वर्षांपासून सर्व नाथभक्‍त आणि पंचक्रोशीतील भाविक प्रत्‍येक गुरुवारी अन् अमावास्‍येला या ठिकाणी पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रम करतात.

गिरणी कामगारांना घरे मिळवण्‍यासाठी सहकार्य करा ! – श्‍यामसुंदर कुंभार, अध्‍यक्ष, सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघ

मुंबईतील ५८ गिरण्‍यांचे कामगार आणि वारसदार यांनी ‘म्‍हाडा’च्‍या घरांसाठी अर्ज भरून दिले आहेत. त्‍याची पडताळणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्‍याची आवश्‍यकता आहे; मात्र अनेक गिरणी कामगार अन् वारसदार यांना पुरावे शोधण्‍यासाठी मुंबईत जाऊनही संबंधित गिरण्‍यांमधून प्रतिसाद मिळत नाही.

ʻईश्वर आहेʼ याचे ज्ञान नसलेल्या विज्ञानाची मर्यादा !

‘आजकाल आपण ज्याला ‘विज्ञान’, म्हणजे ‘विशेष ज्ञान’ म्हणतो, ते ‘विगतं ज्ञानं यस्मात्।’, म्हणजेच ‘ज्यातून ज्ञान निघून गेले आहे ते, झाले आहे.’ विज्ञानाला ‘ईश्‍वर आहे. ईश्‍वर निर्गुण निराकार आहे आणि त्याची व्याप्ती अनंत कोटी ब्रह्मांडांइतकी आहेʼ, हेही ज्ञात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धुळे येथे टिपू सुलतान जयंती साजरी करण्‍यास बंदी !

हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार करून त्‍यांच्‍या हत्‍या करणारा आक्रमक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्‍यावर बंदी आणणे हा धुळे पोलिसांचा योग्‍य निर्णय !

मागील हंगामातील साखर कारखान्‍यांची कोणतीही देय रक्‍कम थकित नाही ! – प्रादेशिक सहसंचालक, कोल्‍हापूर

शासनाचे कर लेखापरीक्षण आणि ऊस दर निश्‍चितीचे नियम पहाता साखर कारखान्‍यांची मागील हंगामातील कोणतीही देय रक्‍कम थकित नाही, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोल्‍हापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कळवली आहे.

धनगर समाजाच्‍या अनुसूचित जमातीतील समावेशासाठी अभ्‍यासगटाची स्‍थापना !

धनगर समाजाला ‘अनुसूचित’ म्‍हणून दाखला मिळावा आणि त्‍या आधारे आरक्षण प्राप्‍त व्‍हावे, यासाठी महाराष्‍ट्र शासनाने एका अभ्‍यास समितीची स्‍थापना केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुधाकर शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ही समिती काम करत आहे.

‘डीपफेक’ची डोकेदुखी !

‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्‍यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्‍यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !

दिवाळीत पुणे येथील ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ बससेवेला ९ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न !

‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्‍या (पी.एम्.पी.एम्.एल्.) दिवाळीमध्‍ये उत्‍पन्‍नामध्‍ये ९ कोटी ६ लाख रुपयांची भर पडली आहे. मागील २ वर्षांच्‍या तुलनेत अनुमाने ३ कोटी रुपयांची वाढ झाली असल्‍याचे दिसून येत आहे.

मुंबईत घरात काही न मिळाल्‍याने शिरस्‍त्राणाची चोरी !

ओशिवरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एका घरात चोर शिरले होते; पण त्‍यांना तेथे काहीच न मिळाल्‍याने त्‍यांनी तेथील एका दुचाकीवरील शिरस्‍त्राण चोरले. हे दृश्‍य सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात दिसत आहे.

आता शनिवारवाड्याचा इतिहास पर्यटकांना ‘डिजिटल ऑडिओ’च्‍या माध्‍यमातून अनुभवता येणार !

शनिवारवाड्याचा इतिहास आता पर्यटकांना ‘डिजिटल ऑडिओ’च्‍या माध्‍यमातून अनुभवता येणार आहे. लवकरच ही सुविधा उपलब्‍ध होणार असून त्‍यासाठी विद्युत् विभागाने सादर केलेल्‍या प्रस्‍तावाला महापालिकेच्‍या स्‍थायी समितीने मान्‍यता दिली आहे.