Lashkar e Taiba : इस्रायलकडून ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी !

तेल अविव (इस्रायल) – कट्टर आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबावर इस्रायलने बंदी घातली आहे. यामुळे इस्रायलने घोषित केलेल्या जिहादी आतंकवादी संघटनांच्या सूचीत लष्कर-ए-तोयबाचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती भारतातील इस्रायली दूतावासाने दिली. यासंदर्भात इस्रायलने प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की, लष्कर-ए-तोयबाने २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईच्या ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी आक्रमण केले होते. यामध्ये शेकडो नागरिकांचे प्राण गेले, तर कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली होती. यंदा या घटनेला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने इस्रायलने त्यांच्या देशाने सिद्ध केलेल्या आतंकवादी संघटनांच्या सूचीत लष्कर-ए-तोयबाच्या नावाचा समावेश केला आहे.

भारताप्रमाणेच इस्रायलही त्यांच्या सीमेच्या आत आणि आसपासच्या भागात कार्यरत असलेल्या आतंकवादी संघटनांची सूची सिद्ध करतो. या सूचीला ‘यूएस् स्टेट डिपार्टमेंट’ने जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे.

संपादकीय भूमिका

आता भारताने ‘हमास’वर बंदी घालावी, अशीच इस्रायलची अपेक्षा असणार, यात शंका नाही ! भारत अशी बंदी घालणार का ?, हाच प्रश्‍न आहे !