शिवशक्‍ती प्रतिष्‍ठान आयोजित गड-दुर्ग छायाचित्र प्रदर्शन

गडदुर्ग प्रतिकृती उभारणार्‍या १३ मंडळांचा सन्‍मान !

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर येथे शिवशक्‍ती प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी काढलेल्‍या भारतातील गड-दुर्गांच्‍या छायाचित्रांच्‍या प्रदर्शनाचे उद़्‍घाटन छत्रपती शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी प्रतिष्‍ठानच्‍या वतीने कोल्‍हापूर शहरात गेली १० वर्षे दीपावलीच्‍या निमित्ताने गड-दुर्गांच्‍या प्रतिकृती उभारणार्‍या १३ मंडळांचा सन्‍मानचिन्‍ह देऊन सत्‍कार करण्‍यात आला. हे प्रदर्शन २५ नोव्‍हेंबरपर्यंत शाहू स्‍मारक भवन येथे खुले रहाणार आहे, तरी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष साताप्‍पा कडव यांनी केले आहे.