३६ घंट्यांत ‘डीपफेक व्हिडिओ’ हटवा अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध व्हा !  

केंद्र सरकारची सामाजिक माध्यमांना चेतावणी !

(डीपफेक म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीच्या तोंडावळ्यात पालट करून फसवणूक करणे)

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर

नवी देहली – केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘डीपफेक’ व्हिडिओ’ प्रसारित करणार्‍यांना चेतावणी दिली आहे. फेसबूक, गूगल आणि यु ट्युब यांवरून ‘डीपफेक व्हिडिओ’ न हटवल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

राजीव चंद्रशेखर यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना सांगितले की, हा फार गंभीर विषय आहे. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे व्हिडिओ प्रसारित करणार्‍यांना ३६ घंट्यांची समयमर्यादा दिली आहे. या काळात त्यांनी ते व्हिडिओ हटवावेत. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत जी सामाजिक माध्यमे असे करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.