तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप
पेडणे, २० नोव्हेंबर (वार्ता.) : तालुक्यातील मोरजी आणि मांद्रे या संवेदनशील समुद्रकिनार्यांवर रात्रीच्या वेळी कर्णकर्कश संगीत पार्ट्या नित्याच्याच झालेल्या आहेत. या संगीत पार्ट्या पहाटेपर्यंत चालू असतात आणि तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.
वास्तविक मोरजी आणि मांद्रे हे या समुद्रकिनारे संवेदनशील अर्थात् ‘सायलेंट झोन’ (कासव प्रजनन केंद्र असल्याने ‘सायलेंट झोन’ घोषित) म्हणून घोषित झालेले आहे आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचे संगीत वाजवण्यास मनाई आहे. स्थानिकांच्या मते जूनस वाडा, मांद्रे येथे वन उद्यानाजवळ असलेल्या ‘ग्रील’ या ‘रिसॉर्ट’मध्ये प्रतिदिन रात्री २ वाजेपर्यंत पार्ट्यांची रेलचेल दिसून येते. याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर काही काळापुरते संगीत बंद केले जाते आणि नंतर पुन्हा कर्णकर्कश संगीत चालू होते. या ‘रिसॉर्ट’मध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी मध्यरात्र उलटूनही संगीत चालू असल्याने स्थानिक रहिवाशांनी रात्री दीड वाजता पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
हरमल आणि आश्वे परिसरांत अनधिकृत ‘मसाज पार्लर’ना ऊत आला आहे. येथे काही ठिकाणी युवतीच पुरुषांना मसाज करत असतात. पेडणे परिसरातील किनारी भागांत नायजेरियाच्या आणि कोलकाता येथील काही युवती अन् महिला उघडपणे अश्लील हातवारे करून ग्राहक मिळवण्यासाठी धडपडत असतात.
संपादकीय भूमिका
|