मुंबई – माझा रंग सावळा असल्याने चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या प्रारंभी मला न्यूनगंड वाटायचा. त्यामुळे गोरा होण्यासाठी मी अनेकदा ‘फेअरनेस क्रीम’ लावायचो; पण या ‘क्रीम’चा मला काहीही लाभ झाला नाही, असे वक्तव्य अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी एका ‘न्यूज पोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
एनबीटी एन्टरटेनमेंट
संपादकीय भूमिका‘फेअरनेस क्रीम’मुळे गोरेपणा येत असल्याचा दावा केला जातो; प्रत्यक्षात त्यातून ‘लाभ अत्यल्प आणि ग्राहकांची फसवणूकच अधिक होते’, असा अनेकांचा अनुभव आहे ! तसेच त्याचे अन्य दुष्परिणाम होतात ते वेगळेच ! त्यामुळे सरकारने अशा उत्पादनांवर स्वतःहून कारवाई केली पाहिजे ! |