Pakistan firing soldier killed : जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या एका सैनिकाचा मृत्यू !

३ आठवड्यांत तिसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील सांबा जिल्ह्यात ९ नोव्हेंबरच्या सकाळी पाककडून गोळीबार करण्यात आला. या वेळी सीमा सुरक्षा दलाचा लाल फर्न किमा नावाचा सैनिक घायाळ झाला. रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने सांगितले की, रामगड सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील नयनपूर चौकीवर हा गोळीबार झाला. ३ आठवड्यांत पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही तिसरी वेळ आहे.

सौजन्य इंडिया टूडे 

अन्य एका घटनेत ८ नोव्हेंबरच्या रात्री शोपियातील कटोहलन भागात भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चकमक झाली. या वेळी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेचा एक आतंकवादी मारला गेला.

गेल्या महिन्यात पाकने शस्त्रसंधीच्या केलेल्या उल्लंघनाच्या घटना !

१७ ऑक्टोबर : ‘पाक रेंजर्स’ने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक घायाळ !

२६ ऑक्टोबर : जम्मूच्या अरनिया आणि सुचेतगड सेक्टरमध्ये पाकने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक अन् एक महिला घायाळ !

संपादकीय भूमिका 

हमास इस्रायलवर आक्रमण करत असून दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू आहे. याच कालावधीत पाक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करू लागला आहे. यातून येणार्‍या काळात भारतावरही जिहादी आतंकवाद्यांकडून अशा आक्रमणाची शक्यता नाकारता येणार नाही !