ओटावामध्ये ‘स्वस्तिका’चे चित्रण अस्वीकारार्ह आहे ! – जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा

  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा हिंदुद्वेष !

  • ‘हेकेन क्रुझ’ या नाझींच्या चिन्हाला ‘स्वस्तिक’ नावाने संबोधले !

ओटावा (कॅनडा) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे कॅनडातील वातावरणही चिघळले आहे. शहरातील क्रेग हेनरी भागात एका ज्यू व्यक्तीच्या घराबाहेर नाझींचे चिन्ह असलेले ‘हेकेन क्रुझ’ रंगवण्यात आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘एक्स’वरून वक्तव्य केले आहे की, जेव्हा आपण द्वेष पसरवणारी भाषा अथवा चित्रे पहातो, तेव्हा आपण त्याचे खंडण केले पाहिजे. ओटावामध्ये स्वस्तिकाचे चित्रण हे अस्वीकारार्ह आहे. कॅनेडियन लोकांना शांततापूर्वक एकत्र येण्याचा अधिकार आहे; परंतु आम्ही ज्यूद्वेष, मुसलमानद्वेष अथवा अन्य कोणत्या प्रकारचा द्वेष सहन करू शकत नाही. (हिंदूंचा द्वेष करणार्‍या खलिस्तानवाद्यांची तळी उचलणार्‍यांना ही भाषा शोभते का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

भारत आणि पर्यायाने हिंदूंचा द्वेष करणारे जस्टिन ट्रुडो यांच्या हिंदुद्वेषी विचारांचे खंडण करण्याची आवश्यकता आहे. एका सार्वभौम प्रगत राष्ट्राचे प्रमुख एका प्रमुख धर्माच्या धार्मिक चिन्हाचा अवमान करत असल्याने जगभरातील हिंदूंनी त्यांना वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक !