कणकवली : शहरातील गणपती साना परिसरात एका युवकाने एका महाविद्यालयीन युवतीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी युवतीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोकांनी तेथे जाऊन त्या युवकाला हे कृत्य करण्यापासून रोखले. त्यानंतर संबंधित युवकाने येथील नदीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिकांनी त्याला वाचवल्यामुळे त्याचा तो प्रयत्नही अयशस्वी झाला. ही घटना ४ नोव्हेंबर या दिवशी घडली. या घटनेनंतर युवतीने येथील पोलीस ठाण्यात युवकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची चर्चा शहरात चालू होती.
संपादकीय भूमिकाचित्रपटांत दाखवतात त्या एकतर्फी प्रेमाच्या कथा काल्पनिक असतात आणि वास्तव निराळे असते एवढेही युवकांना समजत नाही का ? |