ल्यॉन (फ्रान्स) येथे एका महिलेवर आक्रमण करून आक्रमणकर्त्याने दरवाज्यावर रंगवले ‘हेकेन क्रूझ’ !

पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांसह भारतीय प्रसारमाध्यमेही या घटनेमध्ये चिन्हाला ‘हेकेन क्रूझ’ऐवजी स्वस्तिक नावाने संबोधत आहेत !

(हेकेन क्रुझ हे नाझींचे चिन्ह असून ते उलट्या स्वस्तिकाप्रमाणे काढले जाते.)

पॅरिस (फ्रान्स) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्समधील हमास समर्थक आक्रमक झाले आहेत. अशातच फ्रान्समधील ल्यॉन शहरात एका ज्यू महिलेवर आक्रमण करण्याची घटना समोर आली आहे. तिच्या घरात घुसून आक्रमणकर्त्यांनी आक्रमण केले. या वेळी तिच्या घराच्या दरवाजावर नाझींचे चिन्ह असलेले ‘हॅकेनक्रुझ’ रंगवण्यात आले होते. घायाळ महिलेला रुग्णालयात वेळेत नेल्याने तिचा प्राण वाचला. ७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकट्या फ्रान्समध्ये आतापर्यंत ८०० हून अधिक ज्यूविरोधी घटना घडल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा निषेध करावा तेवढा थोडा !