नवी देहली – भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद सोडवण्यासाठी अजूनही कूटनैतिक चर्चेला वाव आहे. सार्वभौमत्व आणि संवेदनशीलता केवळ एका बाजूने असून चालत नाही. दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात असून यावर योग्य उपाय काढण्यात येईल, अशी आशा आहे, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
सौजन्य दपोस्टलाईन
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, मी जाणतो की, कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भूमिकाही माझ्यासारखीच आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, मी कधीच ‘मला त्यांच्या वस्तूनिष्ठ चिंतांविषयी बोलायचे नाही’, असे म्हटले नाही; परंतु ‘आमच्यातील संभाषण माझ्या चिंता आणि भावना यांना पूर्णत: बाजूला सारेल’, हेसुद्धा शक्य नाही.