ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहित लागू होणार !

देशातील एकेका मंदिरात अशा प्रकारचे पालट आता करावे लागत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर देशातील सर्वच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर नियम असतील !

अमेरिकेतील चिनी महावाणिज्य दूतावासात घुसली चारचाकी गाडी !

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील चीनच्या महावाणिज्य दूतावासमध्ये एक अनियंत्रित चारचाकी गाडी घुसली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी पोलिसांनी गाडीच्या चालकावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला.

उत्तराखंडमधील मदरशांची पडताळणी करण्याचा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा आदेश

प्रत्येक राज्याने स्वतंत्रपणे असा आदेश देण्याऐवजी केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी असा आदेश देऊन पडताळणी करावी !

मुख्यमंत्री योगी यांच्या ‘सिंध’ वरील टिप्पणीने पाकचा जळफळाट !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  सिंध प्रांत परत घेण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पाकने टीका केली आहे. ‘योगी यांची ही अत्यंत दायित्वशून्य टिप्पणी आहे’, अशा शब्दांत पाकने संताप व्यक्त केला.

सौदी अरेबियाकडून पॅलेस्टाईनचे समर्थन

जिहादी आतंकवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर जगात इस्लामी देश आणि ख्रिस्ती देश, असे दोन गट पडले आहेत. त्यातही एकीकडे संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन यांनी इस्रायलचे, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे.

कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांंचे त्यांनी दूरभाष करून मला तेथील चालू स्थितीविषयी माहिती दिल्याविषयी आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

आक्रमणात हमासच्या १ सहस्र ५०० आतंकवाद्यांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचा दावा

जिहादी आतंकवादी संघटना हमासने केलेल्या आक्रमणाला इस्रायलकडून गेल्या ४ दिवसांपासून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायलच्या सैन्याकडून पॅलेस्टाईनचा भाग असणार्‍या गाझा पट्टीवर सातत्याने केलेल्या जाणार्‍या बाँबफेकीमुळे तेथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन आतंकवादी ठार

काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवादाचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास पाकच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे !

गोव्यात विना क्रमांक (नंबर प्लेट नसलेल्या), तसेच अस्पष्ट वाहन नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांचा सुळसुळाट !

चौकाचौकांत आधुनिक यंत्रणा असूनही वाहतूक प्रशासन या संदर्भात कारवाई का करत नाही ? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘देव, धर्म आणि देश’ रक्षणाचा आदर्श घेऊन नवा भारत बनवूया ! – डॉ. प्रमोद सावंत

अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.