काश्मिरी हिंदु संजय शर्मा यांच्या हत्येत होता एकाचा हात
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील अल्शिपोरा, शोपिया येथे सुरक्षा दल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन आतंकवादी ठार झाले. मोरीफत मकबूल आणि जाजीम फारुक उपाख्य अबरार, अशी त्यांची नावे असून ते दोघेही ‘लष्कर-ए-तैयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित होते. काश्मिरी हिंदु संजय शर्मा यांच्या हत्येत आतंकवादी अबरारचा हात होता, असे काश्मीरचे सहायक पोलीस महासंचालक रईस महंमद भट यांनी सांगितले. या परिसरात आतंकवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम चालू असून मोठ्या प्रमाणात सैनिकांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
(सौजन्य : CNN-News18)
२६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ‘काश्मीर फ्रीडम फायटर्स’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी संजय शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या विरोधात शेकडो काश्मिरी हिंदूंनी जम्मूमध्ये निदर्शने केली होती.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवादाचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास पाकच्या विरोधात कारवाई करणे आवश्यक आहे ! |