इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात लवकरच होणार होती तडजोड !
रियाध (सौदी अरेबिया) – जिहादी आतंकवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर जगात इस्लामी देश आणि ख्रिस्ती देश, असे दोन गट पडले आहेत. त्यातही एकीकडे संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन यांनी इस्रायलचे, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांनी म्हटले आहे की, आम्ही हा संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. शांततेसाठी आम्ही पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे आहोत.
(सौजन्य : समा टीव्ही)
विशेष म्हणजे इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यातील अनेक दशकांचे शत्रूत्व संपवून तडजोड करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार होते. त्यापूर्वी हमासने इस्रायलवर आक्रमण केल्याने ही प्रक्रिया आता रखडली आहे.