पोर्तुगीज काळात गोव्यात बळजोरीने धर्मांतर झाले ! – डॉ. भूषण भावे

‘‘इन्क्विझिशन’चा कालखंड अत्यंत कठीण होता. या काळात हिंदु धर्माची अवहेलना आणि धार्मिक संस्थांवर अत्याचार झाले. या कालखंडात धर्मसंस्थांनी सोसलेल्या अत्याचाराचा संदर्भ ‘गोंयात जाल्ले धर्मांतर – कथा आणि व्यथा’ या पुस्तकातून मिळतो.’’

कळसा प्रकल्पाला वनक्षेत्राची भूमी देण्यास कर्नाटक सरकारची संमती

‘कर्नाटक नीरवरी निगम’ने कळसा नाल्यावर धरण प्रकल्प उभारणे, ‘पंप हाऊस’ बांधणे, वीज उपकेंद्र उभारणे, पाणी आणि वीजपुरवठा करण्यासाठी परिसरांत सुविधा उपलब्ध करणे, असा प्रस्ताव कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाकडे ठेवला होता.

गोवा : पेडणे विभागीय आराखडा (झोनिंग प्लान) स्थगित !

पेडणे ‘झोनिंग प्लान’ला पेडणे तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे, तसेच ९ ऑक्टोबरपर्यंत आराखडा रहित न केल्यास जनआंदोलन छेडण्याची चेतावणी पेडणेवासियांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पुणे येथे रेल्‍वेचा भीषण अपघात घडवण्‍याचा प्रयत्न फसला !

आकुर्डी ते चिंचवडच्‍या दरम्‍यान असलेल्‍या ‘रेल्‍वे ट्रॅक’वर ६ ऑक्‍टोबर या दिवशी दगड रचले होते. यातून भीषण अपघात करण्‍याचा प्रयत्न होता; मात्र रेल्‍वे गार्डसह माहीतगार्‍यांनी दिलेल्‍या माहितीमुळे त्‍यांचा हा डाव फसला आहे.

डीजेचा आवाज आणि ‘लेझर बीम’च्‍या विरोधात सर्वपक्षीय राजकीय लढा !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत यंदा सलग दुसर्‍या वर्षी ध्‍वनीपातळीने शंभरी पार केली. पोलिसांनी निर्बंध घालूनही मिरवणुकीत त्‍याचे पालन झाले नाही.

गणेशोत्‍सव कालावधीत अन्‍नपदार्थांचा ३१ लाख रुपयांचा साठा शासनाधीन !

गणेशोत्‍सव कालावधीत अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्‍ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गायीचे तूप, भेसळयुक्‍त बटर (लोणी), स्‍वीट खवा आणि वनस्‍पती आदी अन्‍नपदार्थांचा एकूण ३१ लाख २ सहस्र ४७ रुपयांचा साठा शासनाधीन केला असल्‍याची माहिती अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

इस्रायलला साहाय्‍य करण्‍यासाठी अमेरिकेच्‍या युद्धनौका गाझाच्‍या दिशेने रवाना !

हमासने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणप्रकरणी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला साहाय्‍याची घोषणा केली, असे व्‍हाईट हाऊसच्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

साधनेच्या संदर्भात नुसते प्रश्न विचारू नका, तर कृती करा !

‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मराठ्यांची विजयगाथा दाखवणारा ‘बलोच’ मराठी चित्रपट सर्व शाळांत दाखवण्‍यास शासनाची अनुमती !

इतिहासात सीमेपार लढलेल्‍या मराठ्यांचे असीम धैर्य, शौर्य आणि कर्तृत्‍व यांचा रणसंग्राम असलेला ‘बलोच’ हा ऐतिहासिकदृष्‍ट्या चांगल्‍या प्रकारे मांडणीद्वारे निर्मित केलेला मराठी चित्रपट आहे.

कामावर विलंबाने येणार्‍या अधिकार्‍यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत !

मुख्‍य अधिकारी आणि कर्मचारी कामावर विलंबाने येतात, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पदच आहे. अशांवर वेतन कपात, बढती रोखणे अशा शिक्षा करून तरीही सुधारणा न दिसल्‍यास त्‍यांना बडतर्फ करावे !