मुख्यमंत्री योगी यांच्या ‘सिंध’ वरील टिप्पणीने पाकचा जळफळाट !

डावीकडून मुमताज झहरा बलूच आणि योगी आदित्यनाथ

इस्लामाबाद – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  सिंध प्रांत परत घेण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पाकने टीका केली आहे. ‘योगी यांची ही अत्यंत दायित्वशून्य टिप्पणी आहे’, अशा शब्दांत पाकने संताप व्यक्त केला. ‘सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सिंधी अधिवेशनाला संबोधित करतांना मुख्यमंत्री योगी म्हणाले होते की, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर आपण परत घेऊ शकतो, तर आपण पाकिस्तानातील सिंध परत घेऊ शकत नाही, असे म्हणण्याचे काही कारण नाही.

या सूत्रावर प्रसारमाध्यमांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलूच म्हणाल्या की,

भारतीय नेत्याच्या प्रक्षोभक टिप्पण्या ‘अखंड भारता’च्या (अविभाजित भारताच्या) अर्थहीन दाव्यापासून प्रेरित आहेत. त्या म्हणाल्या ‘‘उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अत्यंत दायित्वशून्य वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.’’